या वस्तू वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे. तुम्ही अवघ्या २ मिनिटांमध्ये या वस्तू स्वच्छ करू शकता.
लॅपटॉप, स्मार्टफोन, कॉम्प्युटर या गोष्टी आजच्या काळात अतिशय महत्त्वाच्या झाल्या आहेत. त्यामुळेच त्यांची वेळोवेळी काळजी घेऊन स्वच्छता करणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा लोक या दैनंदिन वापरातल्या वस्तूही स्वच्छ करत नाहीत. यामुळे बरेच आजारही पसरू शकतात. लॅपटॉप, स्मार्टफोन, कॉम्प्युटर या गोष्टी दिवसातले बरेच तास सुरु असतात आणि यामध्ये आपल्या महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित असतात. म्हणूनच या वस्तू वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे. तुम्ही अवघ्या २ मिनिटांमध्ये या वस्तू स्वच्छ करू शकता. यासंबंधी काही टिप्स आपण जाणून घेऊया.
तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या आतमध्ये आणि बाहेर हवेचा योग्य प्रवाह राखणे महत्त्वाचे आहे. तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या दोन्ही बाजूला कमीत कमी तीन इंच जागा असेल याची काळजी घ्या. तसेच हवेचा प्रवाह सुलभ करण्यासाठी तुमची खोली पुरेशी मोठी किंवा हवेशीर असल्याची खात्री करा.
Photos : आता YouTubeवर विना जाहिराती बघता येणार Video; फक्त करा ‘हे’ काम
लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्वच्छ करण्याच्या सोप्या टिप्स तुम्हालाही जर कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा टॅब जास्त वेळ वापरायचे असतील तर ते वेळेवर साफ करत राहा, त्याचबरोबर खालील गोष्टी लक्षात ठेवा.
अनेक वेळा लोक कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप सुरु करून साफसफाई करतात. या स्थितीत तुम्हाला शॉक बसू शकतो किंवा तांत्रिक बिघाड होऊ शकतो. जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप स्वच्छ करता तेव्हा ते बंद असतील याची काळजी घ्या.जर तुम्ही कॉम्प्युटर साफ करत असाल तर रबरचे हातमोजे आणि पायात स्लीपर घाला. यामुळे विजेचा झटका बसण्याची शक्यता कमी होते.जर तुम्ही अनेक महिने कॉम्प्युटर साफ केला नाही तर त्यामध्ये धूळ साचते. त्यामुळे कॉम्प्युटर गरम होऊ लागतो, म्हणूनच साफसफाई करताना कापसाचा वापर करा.व्हायरसपासून आपले डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन अॅप्लिकेशन्स अपडेट करत रहा.लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर साफ करताना पाणी, तेल किंवा कोणत्याही प्रकारचे द्रव वापरू नका.माऊस स्वच्छ करण्यासाठी ते कागदावर घासून घ्या, यामुळे माऊसमध्ये साचलेली घाण लगेच निघून जाईल.Web Title: While cleaning a laptop or computer be sure to take care of these things otherwise there may be a loss of lakhs pvp
Be First to Comment