Press "Enter" to skip to content

Hackers Can Hack Your Phone Through Whatsapp Auto Media Download Setting Know More | व्हाट्सअ‍ॅपमधील 'या' सेटिंगमुळे होऊ शकतो फोन हॅक; लगेच करा बदल

WhatsApp Hack : व्हॉटसअ‍ॅपमधील एक सेटिंग बंद न केल्यास तुमचा फोन हॅक होण्याची शक्यता आहे, कोणती आहे ती सेटिंग जाणून घ्या.

WhatsApp Hack : व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत व्हॉटसअ‍ॅप वापरत असतो. व्हॉटसअ‍ॅपवर चॅटींग, कॉलिंग, व्हिडीओ कॉल, फोटो-व्हिडीओ शेअर करता येणे असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. या बऱ्याच फीचर्सचे अनेक सेटिंग्स पर्याय असतात, त्यापैकी काही सेटींग्स आपल्याला माहित देखील नसतात. असाच एक सेटिंग पर्याय म्हणजे ऑटो डाऊनलोड. या पर्यायामुळे फोन हॅक होण्याची शक्यता असते.

हॅकिंगचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दररोज अनेक लोक हॅकर्सच्या या जाळ्यात अडकतात आणि स्वतःचे नुकसान करून घेतात. व्हॉटसअ‍ॅपमधून फोन हॅक करण्याचा मार्ग म्हणजे जीआयएफ इमेज किंवा ऑटो डाऊनलोड. अनेक वेळा फोनमध्ये ऑटो डाऊनलोड हा पर्याय बंद केलेला नसतो. त्यामुळे जेव्हा फोन इंटरनेटशी जोडला जातो तेव्हा मीडिया फाइल्स आपोआप डाऊनलोड होतात.

आणखी वाचा : पार्किंगमध्ये गाडी शोधण्यासाठी गूगल करणार मदत! काय आहे हे फीचर जाणून घ्या

या स्टेप्स वापरून बदला सेटिंग

ऑटो डाउनलोडमध्ये तुमच्या फोनवर मीडिया फाइल्स आपोआप डाऊनलोड होतात, तेव्हा त्यात ऑडिओ, व्हिडिओ जीआयएफ फाइल्सचा समावेश असतो.यामधील जीआयएफ आणि व्हिडीओ फाइल्समधून हॅकर्स तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकतात.ही सेटिंग सहजरित्या बदलू शकता.यासाठी सर्वात आधी व्हाट्सअ‍ॅपमधील सेटिंग्स पर्यायावर जा.त्यामधील स्टोरेज आणि डेटा पर्याय निवडा.त्यामध्ये ऑटोमॅटिक मीडिया डाउनलोड हा पर्याय दिसेल, त्या पर्यायाला ऑफ करा.ही पद्धत वापरून तुम्ही हॅकर्सना तुमच्या फोनमध्ये प्रवेश करण्यापासून थांबवू शकताWeb Title: Hackers can hack your phone through whatsapp auto media download setting know more pns

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *