Press "Enter" to skip to content

तयार व्हा! Flipkart Big Billion Days Sale 2022 मध्ये मोटोरोला स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स | Motorola Edge 30 Ultra Edge 30 Fusion Moto G And E Series Discount On Moto Phones In Flipkart Big Billion Days Sale Prp 93

मोटोरोला फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सेलमध्ये अतिरिक्त सवलती देखील दिल्या जातील.

Flipkart Big Billion Days Sale 2022 Flipkart वर २३ सप्टेंबरपासून आयोजित करण्यात येत आहे. सॅमसंग, Tecno, OnePlus सारख्या ब्रँडने त्यांच्या स्मार्टफोनवर सेलमध्ये डिस्काउंट मिळण्याबाबत आधीच माहिती दिली आहे. आता लेनोवोच्या मालकीच्या मोटोरोलाने देखील फ्लिपकार्ट सेलमध्ये त्यांच्या स्मार्टफोन्सवर सूट जाहीर केली आहे. सेलमध्ये Motorola Edge 30 Ultra, Edge 30 Fusion, Moto G82, Moto G62 सारखे अनेक Moto फोन लेटेस्ट 200MP कॅमेरासह उत्तम ऑफर देत आहेत.

मोटोरोला फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सेलमध्ये अतिरिक्त सवलती देखील दिल्या जातील. कंपनीचे म्हणणे आहे की Axis Bank आणि ICICI बँक कार्ड यूजर्सना सेलमध्ये ३००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.

मोटोरोला G62 स्मार्टफोन सेलमध्ये बँक ऑफरसह १४,९९९ रुपयांना विकला जाईल. सध्या हा मोटो फोन फ्लिपकार्टवर १५,९९९ रुपयांना लिस्ट झाला आहे. मोटोचा हा लोकप्रिय 5G स्मार्टफोन Android 12 आणि 90Hz रिफ्रेश रेटसह फुलएचडी + डिस्प्लेसह येतो. हँडसेटच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आहे. परंतु बँक ऑफरनंतर ते १६,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.

आणखी वाचा : Zebronics 4K स्मार्ट टीव्हीची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, मॅजिक रिमोटसह परवडणारा ५५ इंचाचा स्क्रीन टीव्ही लॉंच

सेलमध्ये Moto G82 स्मार्टफोन १९,९९९ रुपयांऐवजी १८,४९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळेल.

Moto G52 स्मार्टफोन १५,९९९ रुपयांना सेलमध्ये उपलब्ध करून दिला जाईल. पण बँक ऑफरनंतर हा फोन १४,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.

Moto G32 च्या ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. परंतु सेलमध्ये ऑफरसह ९,८९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.

Moto G31 च्या ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे आणि बँक ऑफरनंतर ती ९,४४९ रुपयांमध्ये उपलब्ध केली जाईल.

Moto E40 स्मार्टफोन ८,०९९ रुपयांना सेलमध्ये उपलब्ध करून दिला जाईल. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच स्क्रीन, ९० Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप आहे. फोनला चार्ज करण्यासाठी ५००० mAh बॅटरी आहे. हँडसेट Unisoc T700 चिपसेट सह येतो.
दुसरीकडे, मोटोरोला एज मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, मोटो एज 30 अल्ट्रा, मोटोरोला एज 30 फ्यूजन आणि मोटोरोला एज 30 प्रो स्मार्टफोन अनुक्रमे ५१,९९९ रुपये, ३६,९९९ रुपये आणि ३९,९९९ रुपयांच्या बँक ऑफरसह उपलब्ध केले जातील.

Web Title: Motorola edge 30 ultra edge 30 fusion moto g and e series discount on moto phones in flipkart big billion days sale prp

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *