वनप्लस नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप स्मार्टफोन वन प्लस ११ सिरीज लाँच करणार आहे. वन प्लस ११ प्रो हा लाँच होणार पहिला स्मार्टफोन असेल, मात्र लाँचच्या अगोदरच या फोनचे डिझाइन लिक झाले आहे.
वनप्लसने आपल्या फोनद्वारे बाजारात धुमाकूळ घातला आहे. कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला वन प्लस १० प्रो ५ जी लाँच केला होता त्यानंतर वन प्लस १० आर ५ जी लाँच केला. त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार वनप्लस नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप स्मार्टफोन वन प्लस ११ सिरीज लाँच करणार आहे. आधी वन प्लस ११ प्रो लाँच होणार. मात्र लाँचच्या अगोदरच या फोनचे डिझाइन लिक झाले आहे.
समाज माध्यमांवरील अहवालांनुसार, वन प्लस प्रो मध्ये एक नवीन गोलाकार कॅमेरा राहू शकतो आणि कंपनी अलर्ट स्लाइडरला परत या फोनमध्ये आणू शकते. फोनमध्ये हॅसेलब्लाड कॅमेरा असू शकतो, कारण वन प्लस आणि हॅसेलब्लाडमध्ये तीन वर्षांची भागीदारी होती. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. कॅमेरा फ्लॅश बॅक पॅनलवरील डावीकडे एका गोलाकार डिझाईनवर दिसून येतो. ऑनलिक्सच्या स्टिव्ह मॅकफ्लायने या फोनचे डिझाइन ट्विटरवर शेअर केले आहे.
(WhatssApp Notification : व्हॉट्सअॅपवरील अनावश्यक नोटिफिकेशनपासून सुटका मिळण्यासाठी वाचा ‘ही’ ट्रीक)
फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसर
फोन स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसरवर चालेल, असे देखील लिकमधून कळले. तसेच फोनच्या पुढील भागाची देखील माहिती मिळाली आहे. फोनला कर्व एज आहेत. १० प्रोमध्ये ६.७ इंचचा क्यूएचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. कदाचित ११ प्रोमध्ये देखील हाच डिस्प्ले मिळू शकतो.
वन प्लस नव्या रंगासह लाँच करणार हा दमदार फोन
दरम्यान वन प्लस हा वन प्लस १० प्राइम ब्ल्यू एडिशन लाँच करणार आहे. अमेजन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमधून या फोनची विक्री होऊ शकते. या फोनचे रंग आकर्षक असणार आहे. फोनमध्ये ६.७ इंचचा फूल एचडी डिस्प्ले, गोरीला ग्लास आणि ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देखील मिळणार आहे.
(तुमच्या व्हॉट्सअॅप मॅसेजवर असू शकते दुसऱ्याची नजर; त्वरीत चेक करा ‘हे’ फीचर)
Be First to Comment