खालील टिप्स तुम्हाला योग्य स्मार्टफोन निवडण्यात आणि खरेदी करण्यात खूप मदत करणार नक्की वाचा.
मागील काही वर्षांत मोबाईल खरेदीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आज स्मार्टफोन नाही, असे सहसा दिसत नाही. त्यातही कंपन्या नवीन स्मार्टफोन सातत्याने बाजारात आणत असतात. त्यामुळे नवीन फोन आला, की कोणता फोन खरेदी करायचा, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, असा प्रश्न पडतो. अनेक जण तर गोंधळात पडतात. कोणता स्मार्टफोन खरेदी करणे योग्य ठरेल, याचा निर्णय घेता येत नाही. मोबाईल फोन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही स्वस्त किमतीत चांगला फोन खरेदी करु शकता. या टिप्स तुम्हाला योग्य स्मार्टफोन निवडण्यात आणि खरेदी करण्यात खूप मदत करणार आहेत.
फोनसाठी योग्य बजेट निवडा
स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी, त्यासाठी योग्य बजेट निवडण्याची खात्री करा, यामुळे तुमची अर्धी समस्या सुटते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार फोनचे बजेट ठरवू शकता, कारण केवळ देखावा किंवा इतर कोणाच्या तरी बोलण्यासाठी महागडा फोन घेणे हा चुकीचा निर्णय असू शकतो. आजकाल फोनचे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे फोनचे बजेट निवडताना हे लक्षात ठेवा.
फीचर प्राधान्य सेट करा
स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्याचा प्राधान्यक्रम निश्चितपणे ठरवा. म्हणजेच, तुम्हाला फोन कोणत्या उद्देशाने घ्यावा लागेल जसे की गेमिंग, कॅमेरा, चांगली बॅटरी लाइफ इ.फीचर्सच्या प्राधान्याच्या आधारावर फोन निवडणे सोपे होते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला फोटोग्राफीसाठी फोन घ्यायचा असेल, तर तुम्ही फोनच्या चांगल्या गोष्टींना प्रथम प्राधान्य देऊ शकता आणि बाकीच्या इतर फीचर्सची सरासरी ठेवून फोन निवडू शकता.
(हे ही वाचा : ७९९९ किंमतीचा Realme Narzo 50i Prime भारतात लाँच; जाणून घ्या फिचर्स आणि बरंच काही.. )
फोन डिस्प्ले
सध्या फोनच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत स्मार्टफोन कंपन्यांनी फोनची किंमत कमी करण्यासाठी फोनच्या डिस्प्ले क्वालिटीसह फीचर्समध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही प्रायमरी फोन बदलण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट १५ हजारांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कमीत कमी एमोलेड डिस्प्ले असलेला स्मार्टफोन घ्यावा. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या फोनमध्ये अधिक बॅटरी बॅकअप तर मिळेलच, पण तुम्हाला व्हिडिओ प्लेबॅकचा चांगला अनुभवही मिळेल म्हणून नवीन फोन घेण्यापूर्वी फोनच्या डिस्प्लेला प्राधान्य द्या.
लेटेस्ट फीचर्स
नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी बाजारातील ट्रेंड आणि नवीन फीचर्सची माहिती नक्कीच घ्या. समजून घ्या की जर तुम्ही नवीन अँड्रॉइड फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अँड्रॉइड १२ किंवा किमान अँड्रॉइड ११ असलेला फोन घ्यावा. यामुळे, जुना अँड्रॉइड फोन लवकरच डाउन-डेट होईल आणि भविष्यात तुम्ही तुमच्या फोनमध्ये अनेक नवीन अॅप्सला सपोर्ट करणार नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नवीनतम अँड्रॉइड वर्जन देखील आवश्यक बनते. तसेच, फोनच्या ४-जी, ५-जी कनेक्टिव्हिटीबद्दल माहिती मिळवा.
Web Title: Mobile buying tips know these important things before buying a smartphone
Be First to Comment