इन्स्टाग्रामवर फक्त स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, पण नव्या फीचरमुळे फिडमध्ये देखील पोस्ट शेअर करता येणार आहे.
इन्स्टाग्राम आणि फेसबुक हे मेटाचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. वापरकर्त्यांना अधिक आकर्षक करण्यासाठी यावर सतत नवनवे फीचर्स लाँच केले जातात. असेच एक पोस्ट शेअर करण्याचे नवे फिचर इन्स्टाग्रामवर लवकरच लाँच करण्यात येणार आहे. सध्या इन्स्टाग्रामवर फक्त स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, पण नव्या फीचरमुळे फेसबूकप्रमाणे इन्स्टाग्राम फिडमध्ये देखील पोस्ट शेअर करता येणार आहे.
इन्स्टाग्रामच्या नव्या फीचरमुळे कोणतीही पोस्ट रिपोस्ट करता येणार आहे. सध्या हा पर्याय केवळ फेसबूकवर उपलब्ध आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये किंवा स्क्रीनशॉट काढून पोस्ट शेअर करता येते. लवकरच येणाऱ्या नव्या फीचरमुळे इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांची आवडती पोस्ट फिडवर शेअर करता येणार आहे.
आणखी वाचा : फक्त १९७ रुपयांमध्ये १०० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाची सुविधा! कोणती कंपनी देतेय ही ऑफर जाणून घ्या
सोशल मीडिया ॲनालिस्ट मॅट नवारा यांनी एका ट्वीटद्वारे इन्स्टाग्रामच्या नव्या फीचरबद्दल माहिती शेअर केली. या नव्या फीचरद्वारे प्रत्येक पोस्टखाली रिपोस्टचा आयकॉन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम वापरकर्ते त्यांना हवी ती पोस्ट शेअर करू शकतील आणि ही पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तींच्या फिडवर कायमस्वरूपी राहील.
Web Title: Instagram new feature users will be able to share post like facebook pns
Be First to Comment