वोडाफोनच्या काही प्लॅन्सवर ७५ जीबीचा एक्स्ट्रा डेटा देण्यात येत आहे.
Vodafone Idea Recharge Plan : वोडाफोन आयडिया (Vi) कंपनीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी नवनवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले जातात. इतर कंपन्यांसह स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उपलब्ध रिचार्ज प्लॅन्सवर अधिक ऑफर्स देण्याचा प्रयत्न केला जातो. अशीच एक ग्राहकांना आकर्षित करणारी ऑफर म्हणजे ७५ जीबीचा एक्स्ट्रा डेटा. सर्वांसाठी डेटा ऑफर हे कॉलिंग इतकेच महत्त्वाचे आहे. दररोज उपलब्ध होणारा डेटा दिवस संपायच्या आधी संपणार तर नाही ना अशी चिंता प्रत्येकाला सतावते. अशातच वोडाफोन आयडियाच्या काही प्लॅन्सवर ७५ जीबीचा तर काही प्लॅन्सवर ५० जीबी एक्स्ट्रा डेटा ही ऑफर नक्कीच सर्वांना चिंतामुक्त करणारी आहे. कोणत्या प्लॅन्सवर उपलब्ध आहे ही ऑफर जाणून घेऊया.
३,०९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
३,०९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन १ वर्ष म्हणजेच ३६५ दिवसांसाठी उपलब्ध असतो.
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह, दररोज २ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएस ही ऑफर उपलब्ध आहे.
या ऑफरबरोबर या प्लॅनवर ७५ जीबीचा एक्स्ट्रा डेटा उपलब्ध होतो.
तसेच या प्लॅनमध्ये डिजनी प्लस हॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रीपशन दिले जाते.
आणखी वाचा : फक्त १९७ रुपयांमध्ये १०० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाची सुविधा! कोणती कंपनी देतेय ही ऑफर जाणून घ्या
२,८९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
२,८९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन १ वर्ष म्हणजेच ३६५ दिवसांसाठी उपलब्ध असतो.
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह, दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएस ही ऑफर उपलब्ध आहे.
या ऑफरबरोबर या प्लॅनवर ७५ जीबीचा एक्स्ट्रा डेटा उपलब्ध होतो.
१,४९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
१,४९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन १८० दिवसांसाठी उपलब्ध असतो.
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह, दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएस ही ऑफर उपलब्ध आहे.
या ऑफरबरोबर या प्लॅनवर ५० जीबीचा एक्स्ट्रा डेटा उपलब्ध होतो.
ही ऑफर १४ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. म्हणजे १,४९९ रुपयांच्या रिचार्जवर ५० जीबी एक्स्ट्रा डेटा हवा असेल तर ही ऑफर १४ सप्टेंबर पर्यंत उपलब्ध आहे.
Web Title: Get 75 gb extra data on these vodafone idea recharge plans know offer price and details pns
Be First to Comment