Press "Enter" to skip to content

South Actor Nagarjuna Akkineni Express His Feelings On Brahmastra Success And Laal Singh Chaddha Failure | 'ब्रह्मास्त्र'च्या यशावर आणि 'लाल सिंह चड्ढा'च्या अपयशावर सुपरस्टार नागार्जुनची पहिली प्रतिक्रिया

ही परिस्थिति एक कटू सत्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने ‘न भूतो न भविष्यती’ असा कमाईचा आकडा गाठून सगळ्या टीकाकारांना गप्प केलं आहे. पहिल्या ३ दिवसातच चित्रपटाने १०० कोटीचा आकडा पार केला आहे. बॉयकॉट ट्रेंड अगदी जोरात सुरू असतानाही या चित्रपटाला मिळालेलं यश हे खूप अनपेक्षित आहे. चित्रपटात रणबीर, आलिया, बच्चनजी यांच्याबरोबरच साऊथचा सुपरस्टार नागार्जुनचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट ठरला असून नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यचा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ फ्लॉप ठरला असल्याने सगळीकडेच लोकं याबद्दल चर्चा करत आहेत.

‘लाल सिंह चड्ढा’ हा फ्लॉप ठरण्यामागे बरीच कारणं होती. शिवाय कलाकारांच्या भूतकाळातील वक्तव्यंसुद्धा त्याला कारणीभूत होती. मुळात हा चित्रपट एका इंग्रजी चित्रपटाचा रिमेक असल्याने लोकांनी आधीच त्याचा बॉयकॉट करायला सुरुवात केली होती. याच चित्रपटातून नागा चैतन्य याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि दुर्दैवाने तो चित्रपट सपशेल आपटला.

याचविषयी नागार्जुनने नुकतंच एका मुलाखतीमध्ये वक्तव्यं केलं आहे. त्याच्या मते ‘लाल सिंह चड्ढा’ हा एक उत्तम चित्रपट होता आणि तो चालायला हवा होता. तो फ्लॉप झाला आणि ब्रह्मास्त्र हीट झाला यावर तो म्हणतो, “हे एक कटू सत्य आहे. चैतन्यचा चित्रपटही चालायला हवा होता, पण हे असं होत असतं. हा आमच्यासारख्या कलाकारांसाठी एक मोठा धडा आहे.”

आणखी वाचा : ओम राऊतच्या बहुचर्चित ‘आदिपुरुष’विषयी मोठा खुलासा; या दिवशी प्रदर्शित होऊ शकतो टिझर

चित्रपटाचं भवितव्य कसंही असो एक परिवार म्हणून आम्ही त्याकडे बघतो असंही नागार्जुन म्हणाला. शिवाय त्याने पुढे सांगितलं की. “आमच्या कुटुंबात आम्ही सगळेच एकमेकांसाठी चांगलाच विचार करतो. चित्रपटप्रदर्शनाची दिवशी आम्ही एकत्र भेटतो आणि त्यावर चर्चा करतो. असे क्षण बऱ्याचदा येतात, पण सध्या हे अनुभव दर सहा महिन्यांनी येऊ लागले आहेत.”

ब्रह्मास्त्रने पहिल्याच आठवड्यात जगभरात तब्बल २०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. तंर ‘लाल सिंह चड्ढा’ला १०० कोटीचा आकडा पारदेखील करता आलेला नाही. एकूणच आमिरसारख्या कलाकाराच्या चित्रपटाला ‘ब्रह्मास्त्र’ने चांगलीच टक्कर दिल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

Web Title: South actor nagarjuna akkineni express his feelings on brahmastra success and laal singh chaddha failure avn

More from मनोरंजनMore posts in मनोरंजन »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *