Press "Enter" to skip to content

Brahmastra Director Ayan Mukharji Open Up About Film And Peoples Reaction While Making The Film Spg 93 | ब्रह्मास्त्र चित्रपटाला १० वर्ष का लागली? दिग्दर्शकाने सांगितलं खरं कारण

नाहीतर ‘ये जवानी दिवानीसारखा चित्रपट बनवला असता.

आलिया भट्ट, रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. दरम्यान ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या पहिल्या भागात शिवाच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि त्याच्या पालकांबद्दल एक कुतूहल निर्माण झाले आहे. पहिल्या भागात या पात्रांबद्दल काहीच दाखवण्यात आलेलं नाही. आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रणबीरच्या शिवाच्या आई-वडिलांची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेत्री दीपिका पदुकोण रणबीरच्या आईच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे आगामी काळातच समजणार आहे.

ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जी तब्बल १० वर्ष चित्रपटावर काम करत होता. या चित्रपटावर काम करत असताना अयान म्हणाला की, ‘माझे आई वडील, नातेवाईक, मित्र मंडळी या दरम्यान मला नेहमी बोलत असत की तू काही काम करत नाहीस पैसे कमावत नाहीस, खरं सांगायचं तर या चित्रपटावर काम करत असताना मी जास्त पैसे कमावत नव्हतो, जस मी आधी कमावत होतो. माझ्या आर्थिक परिस्थितबद्दल माझ्या जवळच्या लोकांना चिंता पडली होती ते मला वेडा समजायला लागले होते. तो पूढे असेही म्हणाला, ‘मी चित्रपटाचा चाहता आहे, मी पॅशनने चित्रपट बनवतो. ‘अवतार’ चित्रपटाचा दिग्दर्शक जेम्स कॅमरॉन ज्याने १९९७ साली टायटॅनिक चित्रपट बनवला आणि ‘अवतार’ हा १२ वर्षांनी बनवला होता. ‘अवतार’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने एक ट्रेंड सेट केला होता. मला कुठेतरी वाटत होते मला काहीतरी मोठे करायचे आहे, जे एक दोन वर्षात नक्कीच बनले नसते. नाहीतर ‘ये जवानी दिवानीसारखा चित्रपट बनवला असता.

‘ब्रह्मास्त्रच्या’ पुढील भागाबद्दल दिग्दर्शक अयान मुखर्जीचं मोठं विधान!! म्हणाला “दुसरा भाग… “

प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडलेल्या या चित्रपटाने बॉयकॉट हॅशटॅगला मात देत स्वतःला सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाचे प्रदर्शन पाहून त्याचे निर्माते आणि कलाकार खूप खूश आहेत. दरम्यान, आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. अयान मुखर्जीच्या मते ‘ब्रह्मास्त्रचा’ पुढील भाग हा पहिल्या आणि त्याच्या पुढील भागाची सांगड घालणारा आहे.

आतापर्यंत या चित्रपटाने ७ मोठे विक्रम मोडले आहेत. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने यावर्षी सर्वात जास्त अॅडव्हान्स बुकिंग झालेल्या भुलभुलैय्या २ ला मागे टाकले आहे.परदेशातूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ची क्रेझ दिसून येत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट जगभरात ९००० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Web Title: Brahmastra director ayan mukharji open up about film and peoples reaction while making the film spg

More from मनोरंजनMore posts in मनोरंजन »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *