Press "Enter" to skip to content

Actress Taapsee Pannu Angry On Reporter When Asked About The Dobaaraa Flop At Event Spg 93 | “आधी तुम्ही… ” अभिनेत्री तापसी पन्नूचा पत्रकारांवर संताप, व्हिडीओ व्हायरल

रेड कार्पेटवरून जात असताना पत्रकारांनी तिच्याशी संवाद साधला होता.

अभिनेत्री तापसी पन्नू ही बॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आज चित्रपटसृष्टीत तिने स्वतःचे स्थान कमावले आहे. अलिकडेच तिचा ‘दोबारा’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता, परंतु या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. चित्रपटालादेखील बॉयकॉट या हॅशटॅगचा सामना करावा लागला होता. हा चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता आणि ५० कोटी या चित्रपटाचं बजेट होतं. तापसी पन्नू कायमच चर्चेत असते. स्वतःची मतं ती कायमच परखडपणे मांडत असते.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग आणि तापसी यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘दोबारा’ला प्रेक्षकांनी बॉयकॉट करावं अशी विनंती केली होती. त्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावरून तिला ट्रोलदेखील करण्यात आलं होत. नुकतीच तिने ओटीटी प्ले अवॉर्ड्स या कार्यक्रमामध्ये आपली हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरून जात असताना पत्रकारांनी तिच्याशी संवाद साधला होता. या प्रश्नोत्तरांमध्ये ती एका पत्रकारावर चांगलीच भडकली. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. ज्यात तापसी असं म्हणत आहे की, ‘ओरडू नका कृपा करून नाहीतर नंतर म्हणाल कलाकारांना धड नीट बोलण्याची सवय नाही’. तेव्हा एका पत्रकाराने तिला विचारले की, ‘तुमच्या दोबारा या चित्रपटाला सोशल मीडियावर विरोध केला जात आहे त्यावर काय सांगाल’ तेव्हा तापसीने लगेच उत्तर दिले की, ‘कोणत्या चित्रपटाला विरोध होत नाही ते तुम्ही सांगा’? तेव्हा पत्रकाराने तिला आणखीन एक प्रश्न विचारताच तापसी भडकली म्हणाली ‘आधी तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या’. पत्रकाराने यावर पुन्हा प्रश्न केला की ‘समीक्षकांनी या चित्रपटाबद्दल फारसे चांगले लिहले नाही यावर काय सांगाल’? त्यावर तापसीने उत्तर दिले की, ‘कोणताही प्रश्न विचारण्याआधी आधी तुम्ही गृहपाठ करून या आणि मग मला प्रश्न विचारा’.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला १० वर्ष का लागली? दिग्दर्शकाने सांगितलं खरं कारण

या चित्रपटाच्या प्रमोशनम दरम्यान असाच किस्सा घडला होता. तापसी कार्यक्रमाला उशिरा पोहचली म्हणून एका फोटोग्राफरनं तिला कार्यक्रमासाठी उशीर झाल्याचे सांगत तिच्याशी वाद घातला. तापसी जेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली तेव्हा फोटोग्राफर तिला फोटोसाठी थांबायला सांगत होते मात्र आयोजकांनी तिला लगेच आत नेले. हा वाद सुरू असताना काही फोटोग्राफर्सनी यात मध्यस्थी करत वाद थांबण्याचा प्रयत्न केला.

‘दोबारा’ या सस्पेन्स चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले होते. एका स्पॅनिश चित्रपटाचा हा रिमेक आहे. तापसी पन्नू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली आहे. याआधी तापसी पन्नू ‘पिंक’, ‘मुल्क’, ‘जुडवा २’, ‘सांड की आंखसारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने करियरची सुरवात दाक्षिणात्य चित्रपटांपासून केली आहे.

Web Title: Actress taapsee pannu angry on reporter when asked about the dobaaraa flop at event spg

More from मनोरंजनMore posts in मनोरंजन »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *