Press "Enter" to skip to content

नवीन तारक मेहता प्रेक्षकांना पटेना, “मालिका आता बंद करा” म्हणत नेटकऱ्यांनी शेअर केले मजेशीर मीम्स | Taarak Mehta Ka Ooltha Chashmah Fans Disappoint Sachin Shroff Share Funny Memes On Social Media See Details

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेमध्ये सचिन श्रॉफ तारक मेहताची भूमिका साकारत आहे. मात्र नेटकऱ्यांनी सचिन श्रॉफला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेमध्ये आता काही नवीन चेहरे पाहायला मिळतात. तारक मेहताची भूमिका साकारणारे कलाकार शैलेश लोढा यांनीसुद्धा या मालिकेमध्ये एक्झिट घेतली. आता त्यांची ही भूमिका अभिनेता सचिन श्रॉफ साकारत आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीच सचिन श्रॉफचा या मालिकेमधील प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. मात्र नवीन तारक मेहता प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक ही मालिका आवडीने पाहतात. मालिकेमध्ये दयाबेन ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीलाही प्रेक्षक मिस करत आहेत. अशामध्येच नव्या तारक मेहताला आपलंस करणं प्रेक्षकांना कठीण जात असल्याचं दिसत आहे. चक्क मालिकाच बंद करा असं नेटकरी सतत म्हणत आहेत.

शैलेश लोढा यांची जागा सचिन श्रॉफ याने घेतल्यामुळे नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स ट्विटरद्वारे शेअर केले आहेत. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधीलच काही फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी हे मीम्स तयार केले आहेत.

आणखी वाचा – पहिल्यांदाच आपल्या रिलेशनशिपबाबत बोलला करण जोहर, म्हणाला, “ब्रेकअप झालं अन्…”

या मालिकेचे नवे भाग पाहणं म्हणजे डोक्याला त्रास आहे असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. आता प्रेक्षक पुन्हा या मालिकेचे जुने भाग पाहण्यात रमले आहेत.

सचिन श्रॉफने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळताच आपलं मत व्यक्त केलं होतं. या मालिकेमधील कलाकारांनी आपल्याला आपलंसं केलं असल्याचंही तो म्हणाला. शिवाय लोकप्रिय मालिकेमध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्याने मालिकेच्या निर्मात्यांचे देखील आभार मानले होते.

Web Title: Taarak mehta ka ooltha chashmah fans disappoint sachin shroff share funny memes on social media see details kmd

More from मनोरंजनMore posts in मनोरंजन »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *