Press "Enter" to skip to content

BSNL Best Recharge Plan With Unlimited Calling And Data For 100 Days In Just 197 Rupees Know More Pns 97 | फक्त १९७ रुपयांमध्ये १०० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाची सुविधा! कोणती कंपनी देतेय ही ऑफर जाणून घ्या

या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह, डेटा आणि फ्री एसएमएस ऑफरदेखील उपलब्ध आहे.

आजकाल महागाईमुळे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत आहे. रिचार्ज प्लॅन देखील याला अपवाद नाहीत. रिचार्ज प्लॅनची किंमत दिवसेंदिवस वाढत असताना सर्वात स्वस्त आणि जास्त ऑफर असणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात आपण असतो. त्यातच एखादा कमी किंमतीचा आणि जास्त ऑफर्स देणारा रिचार्ज प्लॅन उपलब्ध असेल तर आपण पैसे वाचल्याबद्दल आनंदी होतो. अशाच एका रिचार्ज प्लॅनवर फक्त १९७ रुपयांमध्ये १०० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. कोणत्या कंपनीचा आहे हा रिचार्ज प्लॅन जाणून घेऊया.

१९७ रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन बीएसएनएल (BSNL) कंपनीकडुन जारी करण्यात आला आहे. यामध्ये फक्त १९७ रुपयांमध्ये १०० दिवसांसाठी उपलब्ध असणारा रिचार्ज प्लॅन मिळतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सह डेटादेखील उपलब्ध आहे. यासह आणखी काय ऑफर आहेत जाणून घेऊया.

Smartphone Hacks : मोबाईल स्लो झालाय का? स्पीड वाढवण्यासाठी करा हे उपाय

बीएसएनएलचा १९७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत १९७ रुपये आहे.हा रिचार्ज प्लॅन १०० दिवसांसाठी उपलब्ध असतो.यामध्ये १०० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध असते.त्यासह दररोज २ जीबी डेटादेखील उपलब्ध असतो. डेटा संपल्यानंतर डेटाची स्पीड 40kbps होते.१८ दिवसांपर्यंत दररोज १०० फ्री एसएमएस करता येतात.तसेच या रिचार्ज प्लॅनबरोबर ‘झिंग’ ॲपचा ॲक्सेस दिला जातो. सध्या या किंमतीचा कोणताही इतर कंपनीचा प्लॅन उपलब्ध नाही. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि बीएसएनएलच्या या प्लॅनला टक्कर देण्यासाठी वोडाफोन, आयडिया नक्कीच भविष्यात अशी ऑफर असणारे प्लॅन लाँच करतील.

आणखी वाचा : मोबाईलमध्ये का असतो हा लहान होल? काय असते याचे महत्त्व जाणून घ्या

Web Title: Bsnl best recharge plan with unlimited calling and data for 100 days in just 1 rupees know more pns

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *