Press "Enter" to skip to content

Avoid These Mistakes When Laptop Is On Which Can Effect It Badly Pns 97 | लॅपटॉप सुरू असताना 'या' चुका टाळा; यामुळे होऊ शकते मोठे नुकसान

कधीकधी आपण लॅपटॉप बराच वेळ सुरू ठेऊन दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त होतो, पण अशावेळी लॅपटॉप काही कारणांमुळे खराब होण्याची शक्यता असते.

मोबाईल, इंतरनेट याप्रमाणे लॅपटॉप देखील आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. लॉकडाऊनमध्ये ऑफिसला जाणे शक्य नसताना लॅपटॉपवरून काम करण्यास सर्वांना मदत झाली. लॅपटॉपमधून कोणतेही काम करणे सोप्पे आहे. पण बऱ्याच वेळा आपण लॅपटॉपची नीट काळजी घेत नाही, त्याकडे दुर्लक्ष करतो. लॅपटॉप नीट चालण्यासाठी त्याची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक असते. कधीकधी आपण लॅपटॉप बराच वेळ सुरू ठेऊन दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त होतो, पण अशावेळी लॅपटॉप काही कारणांमुळे खराब होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा : फक्त १९७ रुपयांमध्ये १०० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह डेटाची सुविधा! कोणती कंपनी देतेय ही ऑफर जाणून घ्या

लॅपटॉपवर काम सुरू असताना ही काळजी घ्या

लॅपटॉप सुरू केल्यानंतर तो घेऊन फिरू नये. असे केल्यास लॅपटॉपची फ्रेम तुटण्याची शक्यता असते. तसेच यामुळे हार्ड डिस्क खराब होऊन, सर्व डेटा डिलीट होऊ शकतो. त्यामुळे लॅपटॉप चालू असताना त्याला तसेच ऑन ठेऊन फिरणे टाळावे.जर तुम्ही सुरू असलेला लॅपटॉप घेऊन फिरत असाल तर तो पकडण्यात अडचण येते. अशात लॅपटॉप हातातून पडू शकतो. यामुळे इंटरनल हार्डवेअरबाबत समस्या उद्भवू शकते.लॅपटॉप सुरू असताना तो घेऊन फिरल्याने लॅपटॉपच्या स्क्रीनवर परिणाम होऊ शकतो. लॅपटॉप स्क्रीन डॅमेज होण्याची शक्यता असते.लॅपटॉप अधिक काळासाठी उत्तमरित्या काम करावा यासाठी त्याची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. Smartphone Hacks : मोबाईल स्लो झालाय का? स्पीड वाढवण्यासाठी करा हे उपाय

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *