Press "Enter" to skip to content

Apple Ios 16 Will Roll Out Today With This Features

आयओएस १६ अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. त्यामुळे फोनमध्ये अनेक बदल दिसून येतील. मॅसेज पाठवल्यानंतर त्यास डिलीट करणे किंवा एडिट करणे, हेल्थ ट्रॅकर असे अनेक फिचर्स आयओएस १६ मुळे फोनमध्ये दिसणार आहे.

नुकतेच अ‍ॅपलने आयफोन १४ सिरीज लाँच केली, त्यानंतर आज अ‍ॅपलच्या चाहत्यांसाठी आज मोठा दिवस आहे. अ‍ॅपल आजपासून सर्व आयफोन मॉडेल्ससाठी आयओएस १६ अपडेट लाँच करणार आहे. आयओएस १६ अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. त्यामुळे फोनमध्ये अनेक बदल दिसून येतील. मॅसेज पाठवल्यानंतर त्यास डिलीट करणे किंवा एडिट करणे, हेल्थ ट्रॅकर असे अनेक नवे फिचर्स आयओएस १६ मुळे फोनमध्ये दिसणार आहे. भारतात आयओएस १६ आज १२ सप्टेंबरला रात्री १० वाजता लाँच होणार आहे.

या मॉडेल्समध्ये मिळेल आयओएस १६ अपडेट

आयओएस १६ आयफोन ८ आणि त्यावरील मॉडेल्ससाठी उपलब्ध असणार आहे. आयफोन एसई २०२० आणि एसई २०२२ यांना देखील हा अपडेट मिळणार आहे. त्याचबरोबर, नवीन लाँच झालेल्या आयफोन १४ सिरीजमधील फोन्सनापण हा अपडेट असणार आहे.

(आता Facebook, Whatsapp, Instagram कॉल्सवर वापरकर्त्यांकडून आकारले जाणार शुल्क; मोफत कॉलिंग सेवा होणार बंद)

ही आहेत वैशिष्ट्ये

लॉक स्क्रिन कस्टमाइज करू शकाल

आयफोन युजर्सना आयओएस १६ मुळे विविध लॉक स्क्रिन बनवात येईल. त्याचबरोबर, युजरला आपल्या आयफोनच्या लॉक स्क्रिनवर फोटो गॅलरी देखील सेट करता येइल. युजरला लॉक स्क्रिन विजेट देखील कस्टमाइज करता येइल.

लाइव्ह अ‍ॅक्टिव्हिटी

आयओएस १६ चे लाइव्ह अ‍ॅक्टिव्हिटी वैशिष्ट्य वापरकर्त्यांना त्यांच्या लॉक स्क्रीनवरून लाइव्ह होणार्‍या सर्व क्रियांबद्दल जागरूक राहण्यास सक्षम करेल.

वेगळी आयक्लाऊड फोटो लाइब्ररी आणि स्मार्ट मॅसेजिंग

आयओएस १६ मुळे आयफोन युजरला वेगळी आयक्लाऊड फोटो लाइब्ररी बनवता येईल, ज्यास पाच इतर लोकांना शेअर देखील करता येऊ शकेल. आयओएस १६ अपडेटमुळे पाठवलेला मेसेज एडिट करता येईल, पण त्यासाठी केवळ १५ मिनिटांचा वेळ मिळेल. तसेच दोन मिनिटांच्या आत मेसेज डिलीट करता येईल.

पासकीज आणि हेल्थ अ‍ॅपमध्ये मेडिकेशन फीचर

आयओएस १६ द्वारे नवीन पासकी मिळणार आहे जे युजरचा बायोमेट्रिक डेटा जसे फेअ आयडी किंवा टच आईडीचा वापर करून लॉगइन करण्यास मदत करेल. आयओएस १६ द्वारे आयफोन युजरला हेल्थ अ‍ॅपमध्ये नवीन मेडिकेशन फीचर देखील मिळणार आहे.

(Instagram New Feature : फेसबूकप्रमाणे इन्स्टाग्रामवरदेखील शेअर करता येणार पोस्ट; जाणून घ्या काय आहे नवे फीचर)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *