Press "Enter" to skip to content

Tips To Avoid Whatsapp Track By Other User

एरव्ही वॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. लोक त्यातून फाइल शेअरींगही करतात. पण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना आपण त्याच्या सुरक्षेविषयी गाफील राहिलो तर आपले मोठे नुकसान होऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी देखील होत आहे. या अ‍ॅपमधून आपण महत्वाचा डाटा देखील शेअर करतो, तसेच काही चॅट्स या वैयक्तिक असल्याने त्या उघड करता येत नाही. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपबाबत आपण काही खबरदाऱ्या घेतल्या नाही तर तुमचा महत्वाच्या डेटावर कुणी हातसाफ करू शकतो.

एरव्ही वॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. लोक त्यातून फाइल शेअरींगही करतात. पण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना आपण त्याच्या सुरक्षेविषयी गाफील राहिलो तर आपले मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, आपला डेटा कोणी चोरी करू नये किंवा हॅक होऊ नये यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या ऑप्शनद्वारे कोणीही मॅसेज वाचू शकतात

व्हॉट्सअ‍ॅप वेब किंवा मल्टी डिव्हाइस सपोर्ट फॅसिलिटीच्या माध्यमातून कोणाचीही तुमच्या मॅसेजेसवर नजर राहू शकते. ही सुविधा एकापेक्षा अधिक डिव्हाइसेसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याची सोय करून देते. मात्र, या सुविधेचा दुरुपयोग देखील होऊ शकतो. कोणी या सुविधेद्वारे तुम्हाला ट्रॅक करू शकते.

काय करावे?

आपले व्हॉट्सअ‍ॅप उघडा. त्यानंतर वर दिलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर न्यू ग्रूप, ब्रॉडकास्ट, लिंक्ड डिव्हाइस असे पर्याय येतील. त्यातील लिंक्ड डिव्हाइसवर क्लिक करा.लिंक्ड डिव्हाइसवर क्लिक केल्यावर त्यात तुम्हाला तुमचे अकाउंट कुठे कुठे ओपन आहे ते दिसून येइल.आता येथून सर्व डिव्हाइसना लॉगआउट करा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *