Running Mouse: कामात आणि खाजगी आयुष्यात संतुलन ठेवण्यासाठी सॅमसंग कंपनी आता एक अनोखे तंत्रज्ञान घेऊन आली आहे.
Tech Update Running Mouse: कामात आणि खाजगी आयुष्यात संतुलन ठेवण्यासाठी सॅमसंग कंपनी आता एक अनोखे तंत्रज्ञान घेऊन आली आहे. सॅमसंगच्या नवीनतम शोधामुळे आता कामाच्या वेळा मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास हे कामासाठी लागणारं डिव्हाईस चक्क पळून जातं. आहे की नाही भन्नाट कल्पना? प्राप्त माहितीनुसार हा एक नवीन संगणक माऊस आहे जो लोकांना जास्त काम करण्यापासून थांबवण्यासाठी डिझाइन केला आहे. बहुतांश कंपनीमध्ये कामाच्या वेळेच्या बाबत अगदी अस्पष्टपणा असतो. लॉग इनच्या वेळा ठरलेल्या असल्या तरी काम बंद करण्याची वेळ कधीच ठरलेली नसते, यामुळेच कामाचा तणाव वाढून मानसिक अस्वास्थ्य उद्भवू शकते. यावर सॅमसंगचा हा नवा शोध कमाल उपाय घेऊन आला आहे.
रिपोर्टनुसार, सॅमसंग बॅलन्स माऊस नावाचा कॉम्प्युटर माऊस तुम्ही ठरलेल्या तासांच्या पलीकडे काम सुरू केल्यावर तुमच्या डेस्कवरून पळून जातो. एखाद्या खऱ्याखुऱ्या उंदराप्रमाणे दिसत असला तरी हा संगणकाचा माउस दिसायला मात्र फारच गोंडस आहे. सॅमसंगच्या कोरियन यूट्यूब चॅनलवर सॅमसंग बॅलन्स माऊसचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
बॅलन्स माऊस कसे काम करणार? बॅलन्स माऊसची संकल्पना मांडण्यामागील मुख्य कारण म्हणजे कोरियामधील वर्क लाईफ बॅलन्स सुधारणे. सॅमसंगने आपल्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की अनेक कंपनी कर्मचाऱ्यांवर कार्यालयातून बाहेर पडण्यापूर्वी उरलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रचंड दबाव टाकतात. जर कोणी मर्यादेपेक्षा अधिक वेळ काम करताना आढळले तर हे नाविन्यपूर्ण उत्पादन हाताच्या हालचाली ओळखते आणि इनबिल्ट चाकांमुळे पळून जाते.
Heineken Beer Sneakers: शूज मध्ये बिअर, ‘हे’ नवे डिझाईन पाहिले का?
हा माउस पळून गेल्यावर तुम्ही त्याला पकडू शकता का? आता तुम्ही विचार करत असाल…यात काय? तो पळून गेला तर मी पकडेन, बरोबर? तर असं होणार नाही. व्हिडीओमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही उंदीर पळून जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही त्याला पकडू शकता, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण उंदीर खूप वेगाने पळून जातो. आणि जरी तुम्ही यंत्र पकडण्यात यशस्वी झालात तरीही, माउसचा मुख्य भाग बाहेर पडतो.
पहा हा भन्नाट माउस
बॅलन्स माऊस विकत घेऊन लोकांनी कामानंतर आयुष्याचा आनंद घ्यावा अशी सॅमसंगची इच्छा आहे.दुर्दैवाने, माऊस अद्याप खरेदीसाठी उपलब्ध नाही कारण हा केवळ जाहिरात एजन्सीच्या सहकार्याने तयार केलेला एक संकल्पना माउस आहे.
Web Title: Viral video computer mouse that will run away if you work beyond limit check out samsung amazing invention svs
Be First to Comment