Press "Enter" to skip to content

Motorola Edge 30 Fusion And Motorola 30 Ultra Launch In India

देशात मोबाइलची वाढलेली मागणी हेरून देश विदेशातील कंपन्या नवे ५ जी फोन्स भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करत आहे. व्हिवो, वनप्लस नंतर आता मोटोरोलानेही आपले दोन स्मार्ट फोन भारतीय बाजारात लाँच केले आहेत.

भारतीय बाजारात सध्या मोबाइलची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. एकाच यंत्रातून मनोरंजन आणि इतर कामे होत असल्याने तो लोकांच्या गळ्यातला ताइतच झाला आहे. देशात मोबाइलची वाढलेली मागणी हेरून देश विदेशातील कंपन्या नवे ५ जी फोन्स भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करत आहेत. व्हिवो, वनप्लस नंतर आता मोटोरोलानेही आपले दोन स्मार्ट फोन भारतीय बाजारात लाँच केले आहेत.

मोटोरोलाने Edge 30 Ultra आणि Edge 30 Fusion हे दोन फोन ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत. एज ३० मध्ये स्नॅपड्रगन ८ प्लस १ चिपसेट देण्यात आले आहे, तसेच या फोनमध्ये २०० मेगापिक्सेलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जो गुणवत्तापूर्ण छायाचित्र देण्यास मदत करेल. तर एज ३० फ्यूजनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्लस चिपसेट देण्यात आले आहे, जे गेमिंग आणि फोनचा परफॉर्मन्स वाढवण्यात मदत करेल.

(आता घरीच मिळेल थिएटरचा आनंद, 104w स्पिकरसह लाँच झाली ‘ही’ स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

अल्ट्रा आणि फ्यूजन फोनची किंमत

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या एज ३० अलट्रा या फोनची किंमत ५९ हजार ९९९ इतकी आहे. हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल आणि बिग बिलियन डे सेलमध्ये फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये असेल. तर अल्ट्रा प्रमाणे स्टोरेज आणि रॅम असलेल्या एज ३० फ्यूजनची किंमत ४२ हजार ९९९ इतकी राहील. सेलमध्ये फोनची किंमत ३९ हजार ९९९ इतकी असेल.

एज ३० अल्ट्राचे फीचर

एज ३० अल्ट्रामध्ये अँड्रॉइड ओएस अपडेट १३. १४ आणि १५ मिळेल. त्यामध्ये चार वर्षांचा सिक्युरिटी अपडेट देखील मिळेल. फोन ६.६७ कर्व डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये एचडीआर १० प्लस आणि गोरीला ग्लास ५ प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये ४ हजार ६१० एमएएची बॅटरी आहे जी १२५ वॉट वायर चार्जिंग आणि ५० वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.

(फ्लिपकार्ट सेलमध्ये google pixel 6a ५ जी फोनवर मिळणार ९ हजार रुपयांची सूट, ‘हे’ केल्यास आणखी ६५०० रुपये वाचतील)

फोनमध्ये २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. प्राइमरी कॅमेरा ५० मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड सेंसरसह येतो. पोट्रेट सेंसर १२ मेगापिक्सेलचा आहे. ६० मेगापिक्सेल कॅमेरा ४के रेकॉर्डिंग सपोर्ट करतो आणि प्राइमरी कॅमेरा ३० एफपीएस ८ के रेकॉर्डिंग सपोर्ट करतो. फोन ५ जी आहे.

एज ३० फ्यूजनचे फीचर

एज ३० फ्यूजनमध्ये दोन वर्षांच्या ओएस अपडेटचे आश्वासन देण्यात आले आहे. फोनमध्ये ६.५ इंचाची स्क्रीन आहे जी अल्ट्राच्या तुलनेत कमी आहे. या फोनचे फीचर्स जवळपास अल्ट्रा सारखेच आहे. फोनमध्ये केवळ ६८ वॉट वायर चार्जिंगच्या सुविधेसह ४ हजार ४०० एमएएचची बॅटरी मिळते. फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा आणि १३ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड सेंसर आणि एक डेप्थ सेंसरचा समावेश आहे. फोनच्या पुढील भागात ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. प्रायमरी कॅमेरा ८ के व्हिडिओ रेकॉर्ड करतो. फोन ड्युअल सिम आहे. फोन ५ जी आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *