Press "Enter" to skip to content

५० MP कॅमेरा असलेला Vivo Y22 स्मार्टफोन भारतात दाखल, किंमत आणि सर्व फीचर्स जाणून घ्या | Vivo Y22 Launched Price 14999 Rupees Specifications Features Prp 93

Vivo ने भारतात आपल्या Y-सीरीज मध्ये नवीन बजेट स्मार्टफोन लॉंच केला आहे.

Vivo ने भारतात आपल्या Y-सीरीज मध्ये नवीन बजेट स्मार्टफोन लॉंच केला आहे. नवीन Vivo Y22 स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, ६.५२ इंच HD+ डिस्प्ले, ६ GB रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज सारखी फीचर्स आहेत. फोन ५००० mAh बॅटरीसह येतो. Vivo च्या या नवीन हँडसेटमध्ये काय खास आहे? किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित प्रत्येक माहिती जाणून घ्या….

Vivo Y22 Price in india
Vivo Y22 च्या ४ GB रॅम आणि ६४ GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. तसंच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सुद्धा हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. हा फोन स्टारलाईट ब्लू आणि मेटाव्हर्स ग्रीन कलरमध्ये मिळतो. ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, ऑफलाइन SBI, Kotak आणि One Card क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास १००- रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. हा फोन विवो इंडियाच्या ई-स्टोअर आणि देशभरातील इतर रिटेल स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो. दुसरीकडे तुम्ही हँडसेट ऑनलाइन खरेदी केल्यास तुम्हाला HDFC कार्डद्वारे ७५० रुपयांपर्यंत सूट मिळेल.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा Vivo स्मार्टफोन गेल्या आठवड्यात इंडोनेशियन मार्केटमध्ये लॉंच करण्यात आला होता.

आणखी वाचा : 5G साठीची तगडी स्पर्धा! केवळ १५ हजारात iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री, जाणून घ्या फीचर्स

Vivo Y22 Specifications
Vivo Y22 स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय मॅक्रो सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटमधील मागील कॅमेरा सुपर नाईट मोडसह येतो. याशिवाय, कॅमेरा मल्टी स्टाइल पोर्ट्रेट आणि व्हिडीओ फेस ब्युटी सारख्या फीचर्सना देखील सपोर्ट करतो.

डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर Vivo Y22 मध्ये ६.५५ इंच HD+ (१६१२×७२० pixels) Hello Full View डिस्प्ले आहे. फोनमध्ये कर्व्ह्ड डिस्प्ले उपलब्ध आहेत. सुरक्षेसाठी यात फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस वेक फीचर देखील आहे. याशिवाय जो निळा प्रकाश कमी करतो आणि स्क्रीनला वार्म कलरमध्ये अॅडजस्ट करतो तो आय प्रोटेक्शन मोडसुद्धा देण्यात आला आहे.

आणखी वाचा : १ वर्ष रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही! Reliance Jio च्या प्लॅनमध्ये ७३० GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल

Y22 मध्ये MediaTek MT6769 प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये ४ आणि ६ GB रॅम आणि ६४ GB आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेजचा ऑप्शन आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज १ टीबी पर्यंत वाढवता येते. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी १८ W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo Y22 स्मार्टफोनमध्ये उत्तम गेमिंग एक्सपिरीयन्स उपलब्ध आहे. फोनमध्ये मल्टी टर्बो ५.५ आणि अल्ट्रा गेम मोड देखील देण्यात आला आहे. हँडसेट Android 12 आधारित Funtouch OS 12 सह येतो. याशिवाय फोनमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस, ए-जीपीएस सारखे स्टँडर्ड कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.

Vivo म्हणते की सर्व Vivo डिव्हाईसप्रमाणे, नवीन Vivo Y22 देखील ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा भाग आहे. हा फोन कंपनीच्या ग्रेटर नोएडा येथील कारखान्यात बनवण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *