Press "Enter" to skip to content

‘या’ तारखेपासून सुरू होतोय Flipkart Big Billion Days सेल; टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनवर ८० टक्क्यांपर्यंत सूट

भारतात सणासुदीचे दिवस जवळ येत आहे आणि ऑनलाइन तसंच ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर सेलची तयारी सुरू झाली आहे. देशातील दोन सर्वात मोठ्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स Flipkart आणि Amazon वर देखील वार्षिक सेल जाहीर करण्यात आला आहे. Flipkart ने १३ सप्टेंबर २०२२ रोजी बिग बिलियन डेज सेलच्या ९व्या एडिशनची तारीख देखील जाहीर केली आहे. Flipkart Big Billion Days येत्या २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्हल सेल देखील २३ सप्टेंबरपासून सुरू होईल. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत चालेल.

फ्लिपकार्टने माहिती दिली आहे की, सेल सुरू होण्याआधी यूजर्स १ रुपये भरून इलेक्ट्रॉनिक्स, घर, सौंदर्य यासह अनेक कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सची अॅडव्हान्स बुकिंग करू शकतील. Flipkart सेलपूर्वी ‘कूपन रेन’ चा गेम देखील उपलब्ध असेल. या माध्यमातून यूजर्स त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत खेळून रिवॉर्ड जिंकू शकतील.

आणखी वाचा : ५० MP कॅमेरा असलेला Vivo Y22 स्मार्टफोन भारतात दाखल, किंमत आणि सर्व फीचर्स जाणून घ्या

फ्लिपकार्टने असंही सांगितलं की, “सेलमध्ये १३० स्पेशल एडिशन प्रोडक्टसह ९० हून अधिक ब्रँड्समधील १० हजाराहून अधिक नवीन प्रोडक्ट पाहायला मिळतील.”

फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला वेगवगळ्या कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट, कॅशबॅक, बँक ऑफर मिळतील. सेलमध्ये Poco, Realme, Samsung आणि Vivo सह इतर अनेक ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट उपलब्ध असेल. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अॅक्सेसरीजवर ८० टक्के डिस्काउंट दिलं जाईल. फ्लिपकार्टने या सेलमध्ये बँक कार्डद्वारे १० टक्के डिस्काउंट जाहीर केलं आहे.

आणखी वाचा : 5G साठीची तगडी स्पर्धा! केवळ १५ हजारात iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री, जाणून घ्या फीचर्स

Axis Bank आणि ICICI बँक यांनी Flipkart Big Billion Days सेलसाठी भागीदारी केली आहे. म्हणजेच ग्राहकांना ICICI बँक आणि Axis बँक कार्डद्वारे खरेदीवर १० टक्के झटपट सूट घेता येईल. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर ५ टक्के कॅशबॅक देखील दिला जाईल. सेलमध्ये ग्राहकांना फ्लिपकार्ट पे लेटर सुविधेचा लाभही घेता येईल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *